नुकतीच अमेरिकन जिओफिजिकल युनियन (American Geophysical Union - AGU) २०२६ पुरस्कार विजेते म्हणून भारतीय शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल आणि नीलिमा सत्यम यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- प्रगत पृथ्वी आणि अंतराळ विज्ञानातील संशोधन, शिक्षण तसेच नाविन्यपूर्ण कार्यांमधील उत्कृष्ट कामगिरी व नेतृत्वाचा गौरव करणे या मुख्य उद्देशासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
- यंदा AGU मार्फत ४३ पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले असून भारतीय शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल आणि नीलिमा सत्यम यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
- डिसेंबर २०२६ मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या AGU च्या वार्षिक अधिवेशनात सदर पुरस्कार हे अधिकृतपणे प्रदान करण्यात येतील.
भारतीय विजेत्यांबाबत महत्वपूर्ण माहिती :
१. रॉक्सी मॅथ्यू कोल:
- पुणे, महाराष्ट्र येथील 'भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये (Indian Institute of Tropical Meteorology - IITM)' कोल हे सध्या हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
- AGU च्या 'पावेल एस. मोलोहानोव्ह क्लायमेट कम्युनिकेशन्स प्राईझ' साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
- विशेषतः हवामान बदलाशी संबंधित संशोधनाबाबत महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
- २,५०,००० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक, कोरीव काम केलेले पुरस्कार-चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२. नीलिमा सत्यम:
- नीलिमा या मध्य प्रदेशातील 'भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT)' इंदूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
- AGU च्या 'देवेंद्र लाल मेमोरियल मेडल (Devendra Lal Memorial Medal)'साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
- पृथ्वी किंवा अंतराळ विज्ञानातील उत्कृष्ट संशोधनासाठी, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या किंवा मध्य-टप्प्यावर असलेल्या शास्त्रज्ञाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
- त्यांना विशेष पदक आणि AGU चे आजीवन सदस्यत्व प्रदान केले जाईल.